Importance of Community Engagement in TB

टीबीमध्ये सामुदायिक सहभागाचे महत्त्व

सामाजिक स्तरावर आधारित क्षयरोग विषयी उपक्रम औपचारिक आरोग्य सुविधांच्या आवाराबाहेर (उदा. विस्तृते आणि दवाखाने) समुदाय-आधारित संरचनांमध्ये ( (उदा. स्कूल आणि प्रार्थनास्थळे) सार्वजनिक ठिकानी आयोजित केले जातात. सामुदायिक आरोग्य कर्मचारी आणि स्वयंसेवक समुदाय -आधारित क्षयरोग उपक्रम राबवतात. या दोघांनाही सरकार गैर-सरकारी संस्था आणि/किंवा सरकारद्वारे पाठिंबा मिळू शकतो. 

आरोग्य सेवेचा विस्तार वाढवण्यासाठी आणि  लोक-केंद्रित एकात्मिक काळजीवाहू आरोग्यसेवा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी समाज हा एक किफायतशीर माध्यम आहे.
 

TB Champion

टी बी चॅम्पियन

टीबी चॅम्पियन अशी व्यक्ती आहे त्याला किंवा तिला क्षयरोग होता आणि त्यावर यशस्वीरित्या उपचार पूर्ण केले आहेत.

टीबी चॅम्पियन्स, हे समाजासाठी एक आदर्श म्ह्णून आहेत आणि ते टीबी रुग्णांसाठी आणि त्यांच्या कुटुंबांसाठी महत्वाचा आधारस्तंभ म्हणून काम करू शकतात.

TB Awareness Generation in Community

समाजामध्ये  टीबी जागरूकता निर्मिती

पंचायत राज सदस्य आणि उपचार सहाय्यक गटांसह समाजातील प्रभावशाली व्यक्ती जसे शिक्षक, धर्मगुरु यांना NTEP मध्ये सामील करुन त्यांचे प्रबोधन करणे आणि यांच्या मार्फत विविध आरोग्य कार्यक्रम राबवणे, लोकांमध्ये आरोग्याच्या चांगल्या सवयी निर्माण करणे, समाजामध्ये जागरुकता निर्माण करणे आणि टीबी तपासणी साठी लोकांना प्रोत्साहित करणे, या गोष्टी कराव्यात.  
 

Counselling of TB Patients

टीबी रुग्णाचे समुपदेशन

आरोग्य सेवा देणारे आणि रुग्ण यांच्यातील गोपनीय संवाद जो रुग्णाला त्याच्या/तिच्या भावना व्यक्त करण्यास, तणावाचा सामना करण्यास आणि उपचारांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यास मदत करतो.

रुग्णाला तीनही टप्प्यांवर समुपदेशन केले पाहिजे, म्हणजे,
 

उपचारपूर्व समुपदेशन'' (टीबी रोग आणि उपचार याबद्दल)

Treatment supporter to TB Patient

क्षयरुग्णास  उपचार घेण्यासाठी पाठबळ / प्रोत्साहन करणारे सहाय्यक

उपचार सहाय्यक कोणतीही व्यक्ती असू शकते जसे की वैद्यकीय अधिकारी, बहुउद्देशीय    आरोग्य कर्मचारी (MPWs), कार्यक्रमात काम करणारे समुदाय स्वयंसेवक इ. तसेच रुग्णाचे नातेवाईक किंवा कुटुंबातील सदस्य देखील उपचार सहाय्यक असू शकतात.

NTEP मार्गदर्शक तत्त्वांनुसार, पगारदार  /NTEP सार्वजनिक आरोग्य सेवेतील  कर्मचार्यांना देखील रूग्णासाठी उपचार सहाय्यक म्हणून नियुक्त केले जाऊ शकते. मात्र, ते कोणत्याही मानधनासाठी पात्र असणार नाहीत.

Task performed by Health Volunteers on Home Visit to TB Patient

CHVs द्वारे टीबी पेशंटला होम व्हिजिट करताना करावयाची बाबी

TB साठी चार लक्षणांच्या कॉम्प्लेक्ससाठी तपासणी ( स्क्रीनिंग ) आणि चाचणीसाठी संदर्भ सेवा  देणे.

  • उपचारांच्या पालनासाठी पाठबळ / प्रोत्साहन
  • स्व-निरीक्षण करून
  • रुग्ण/कुटुंब समुपदेशन, पाठबळ / प्रोत्साहन
  •  समवयस्क गट पाठबळ / प्रोत्साहन सभा

 
टीबी रुग्णांचे समुपदेशन

Home visit to TB Patients

टीबी रुग्णाला घरी भेट

रुग्णाला तो/ती कोणत्या आजाराने ग्रस्त आहे आणि त्याच्या उपचाराचा मार्ग काय आहे याविषयी रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांकडे किती माहिती आहे हे जाणून घेण्यासाठी
रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांशी संवाद महत्त्वाचा आहे.
 
गृहभेटी दरम्यान खालिल बाबी प्रामुख्याने  केल्या  जाव्या:

Subscribe to