Content Status

Type

Linked Node

Content

टीबी रुग्णांचा पाठपुरावा

क्षयरोग उपचार प्रतिसाद जाणून घेण्यासाठी आणि रुग्ण बरा झाला आहे की नाही हे निर्धारित करण्यासाठी, प्रत्येक चार आठवड्यांच्या उपचारांच्या शेवटी टीबी रुग्णांचे वैद्यकीय मूल्यमापन केले जाते आणि प्रत्येक उपचार टप्प्याच्या शेवटी(म्हणजे, अतिदक्षता  टप्पा आणि नियमित   टप्पा) बेडका चाचणी करून त्यांचा पाठपुरावा देखील केला जातो.
 
वैद्यकीय तपासणी   दरम्यान खालिल बाबीसाठी  टीबी रुग्णांचे मूल्यांकन केले जाते
औषधांच्या संभाव्य प्रतिकूल प्रतिक्रिया ओळखा;
•    इतर रोगांसाठी वैद्यकीय तपासणी करणे (Comorbid Condition)
•    वजन बदलणे
•    औषधोपचार पालनाचे मूल्यांकन करा; आणि त्यांची लक्षणे पाहून उपचाराची प्रभावीतता निश्चित करा

प्रत्येक रुग्ण उपचारांना वेगळ्या गतीने प्रतिसाद देत असला तरी, क्षयरोगाची सर्व लक्षणे हळूहळू सुधारली पाहिजेत आणि शेवटी निघून जावीत.
 
उपचाराच्या पहिल्या 2 महिन्यांत ज्या रूग्णांची लक्षणे सुधारत नाहीत किंवा ज्यांची लक्षणे सुरुवातीला सुधारल्यानंतर खराब होतात किंवा वाढतात ,त्यांचे औषधोपचार पालन करण्या संबंधित समस्या आणि औषधांच्या प्रतिरोध (Resistance) विकासासाठी पुनर्मूल्यांकन केले पाहिजे.

Content Creator

Reviewer